एक खूप मोठी खोली आहे। त्यात असंख्य स्कूटर्स ओळीने चकाकत उभ्या आहेत। स्कूटर्च्या रांगेत आपल्या फाटक्या खिशात हात टाकून तो काही विचार करत उभा आहे खोलीतील तापमानाबरोबर त्याच्यावरही एक विचित्र दबाव वाढत चालला आहे। अचानक त्याला जाणवले की आपल्या शरीरवरचे त्याचे नियंत्रण संपुष्टात आले आहे। पायाकडे शरीर एका स्कूटरमध्ये परिवर्तित झाले आहे. आधी मागचे चाक, बॉडी,सीट.......अन मग त्याचे दोन्ही हात हे स्कूटरच्या हँडिलच्या रूपात आले डोक ‘‘माईलोमीटर’’ मधे बदलू लागल आहे।
माईलोमीटर ने तो आपल्या चहूकडे बघू शकतोय। सुनीलने त्याला आपल्या धराबाहेर सडकेवर उभे केले आहे। नवीन स्कूटर मिळाल्याने तो फार खुश आहे। बेफिक्रीने गुणगुणत तो एक किक मारतो। त्याला या गोष्टीची मुळीच चिंता नाही की स्कूटरच्या रूपात त्याचे सासरेच समोर उभे आहेत।
सुनील जवळ सरोज पण उभी आहे। ती खूप उदास दिसतेय। सुनील तिला गियर मधे टाकतोय आणि त्या दोघांना बसवून तो सडके वर धावू लागतो।
‘रिझर्व’ चा इशारा मिळात्यावर देखील सुनील तिला दौडवत राहतो। पण स्कूटर असो की माणूस पेट्रोल शिवाय किंवा रक्ता शिवाय कोण किती धावेल?
‘‘तुइया बापाने स्कूटरच्या नावावर हा खटारा माइया गल्यात बांधला’’ सुनील बायकोवर खेकसतो’’ आपल्या बापाला सांग सुधरून द्या म्हणावं–सहा महिन्यापासून पेट्रोल करता पैसे पाठवले नाहीत। बदमाश–धोकेबात–तिला धावलेच पाहिजे–सुनील जोरात स्कूटरला लाथ मारतो। नाही तर मी.......’’ तो कोपयांतला घासलेट डबा बघतो।
‘‘नको–तिला जाळू नका’’ तो लाचारपणे आपल्या वृद्ध थकलेल्या शरीराकडे बघते!
त्याला जाग आलीय शरीर घामाने डबलबलेय। जोराची धाप लागली होती। हृदयाची धडधड अनियमित होऊन कानपी वर घणाचे घाव घालत होती।
‘‘काय झालं हो? वाईट बघितलं का?’’ बायकोनं घाबरून त्यांच्याकडे बघत विचारलं।
स्वप्नाच्या प्रभावातून तो अजूनही मुक्त झाला नव्हता त्याने भिंतीवरच्या घडयाळाकडे बघून विचार केला की सकाळचे पाच वाजून गेले आहेत। दिल्लरहून येणान्या सर्व गाडया निघून गेल्या असतील।
‘‘सुनील आज सुद्धा आला नाही।’’ कापन्या आवाजात तो म्हणाला। वाटतंय तुइन्या पत्रांचाही त्याच्यावर काही परिणाम झालेला नाही। दीर्घ उसासा सोडीत म्हातारी म्हणाली। आज पूर्ण सहा महिने लोटले। सरोजला इकडे येऊन.....आता तर तिचा चेहरा बघूनच त्याला भडभडून येतं।
खोलीत विचित्र शांतता पसरलीय। एकमेकांची नजर चुकवत दोघांनी आपले अश्रू पुसले।