नाही. तो गेला की इकडे प्रॉडक्शन थांबेल....सोमवारपर्यंत माल सप्लाय करायचाय! क्बूल केल्याप्रमाणे माल पाठवला नाही, तर पुढची ऑर्डर मिळायची नाही। बाबूलालच्या जाण्याने फॅक्टरीचं केवढ़ तरी नुकसान होईल। हाँ...आता हे पत्र बाबूलालपर्यंत पसोहोचलंच नाही तर....बाबूलाल मन लावून आपलं काम करत राहील। ओव्हर टाईम, डबल शिफ्ट प्रॉडक्शन....कॉटॅ्रक्ट पूर्ण आणि फॅक्टरीला पुढची ऑर्डर...’
मि. सिंहनी पत्र फाडून जाळून टाकले। ते केबीनबाहेर आले। तेव्हा बाबूलाल समोरूनच येत होता।
‘साहेब, माइया गावाकडून काही पत्र आलंय?’
‘नाही...नाहीकृअरे पत्र आलं की पाठवीन ना तुइयाकडे! काळजी करू नकोस!
निश्चिंत राहा!’
‘उपकार होतील साहेब!’
बाबूलाल निंश्चिंत होऊन पुढे निघाला। त्याच्या मनात आलं, भगवतीला आता फक्त पाचवा महिना चालू आहे। पत्र यायला अजून चार महिने बाकी आहेत।’