त्याच्या बायकोच्या भावाने दार उडलं आणि मेहुण्याला अचानक समोर बघून तेा असा संकोचला जणू त्याच्या शरीरावर उरलेली एकमात्र निकर कोणी खेचून काढली असावी। दाराच्या मागे होत त्याने मेहूण्याला आत येण्याकरता वाट दिली। त्याचे पिचके गाल व हाडाचा सापला झालेला देह पाहून तो चकितच झाला।
घरात शिरतांना त्याची दृष्टी जागोजागी पोपडे निघालेल्या भिंतीकडे व रंग उडालेल्या दारे खिडक्यांकडे गेली व तो विचारात पडला। पुढच्या खोलीतील जर्जर सोफ्यावर बसून त्याला फार अस्वस्थ वाटू लागलं। त्याला वाटले की आपल्या अचानक आगमनामुले सासू सासरे घबरून कुजबुजताहेत।
स्वयंपाक घरातून स्टोव पेटण्याचा आवाज येऊ लागला। एकाएकी ताज्या मांसाचा वास त्याच्या नाकात शिरला। त्याला वाटले हा कदाचित भास असावा, पण जेव्हा सासूने त्याच्या पुढे जेवण्याचे ताट ठेवले तर तो चकीतच झाला भाजीच्या वाटीत मांसाचे अगदी ताजे तुकडे रक्ताच्या रसात तरंगताना त्याला दिसले। बस! त्याच क्षणी त्याला सर्व परिस्थिती लक्षात आली। सासरे पूर्ण बाह्यांचा शर्ट घालून समोर बसले होते। त्यांच्या हातातून काढलेले मांस कोणाला दिसू नये म्हणून त्यांनी फुलशर्ट घातला होता बहुधा। सासरे बुवांनी स्वत: कडून बरीच कालजी ेतली होती। त्यांनी आपल्या गालाच्या आंतले मांस ही काढवले होते पण पोकल झालेले खे त्यांना लपवता आले नव्हते। सासूबाईंनी पण मोठया हुषारीने फाटकी शाल पांघरली होती। म्हणजे जांा लपवण्याचा प्रयत्न करीत होता। त्याची बायको भाजीच्या वाटीत चमचा फिरवत आपल्याच विचारात गुंग होती। ‘‘ध्या जांवई बापू....जेवा सुरू करा ना.....’’ आपल्या सासन्याची विनंती त्यांच्या कानावर पडली।
‘‘मी माणसाचे मांस कधी खात नाही।’’ असे म्हणून त्यानं वाटी दूर सरकवली। आपली चोरी पकडली गेली हे पाहून सर्व जण कावरीबावरी झाली, ‘‘हे काय म्हणताय तुम्ही? साजुक तुपाची भाजी आहे ही।’’ पत्नी डोले विस्फारून त्याच्याकडे बत उारली। जावई बापू रागावू नका। आम्ी तुमच्या सरबराईत जास्त काही करू शकलो नाही। सासू अजीजीने म्हणाली।
‘‘हे बग्घा!मी रागावलेलों नाही....’’ त्याने हसत म्हटले–‘‘मला मनापासून आपला मुलगाच समा आणि स्वत: चे मांस वाढणे बंद करा। जे तुम्ही खाता तेच मला वाढा, मी ते आनंदाने खाईन।’’
ते सर्व आता बुचकल्यात पडल्यासारखे सारे समोर उभे होते। त्याने आपल्या लहान मेहुण्याकडे बतिले तो निरागसपणे त्यांच्या कडेच बघत होता। सासूसासन्यांना हायसं वाटलं। जणू अजगराच्या विल्ख्यातून सोडवले गेलेत। पत्नीच्या डोल्यांतून अश्रू ओल्त होते।
हे सर्व बघून त्याला वाटले की हा मांसाचा वास त्याला फार पूर्वीच का आला नाही? |