श्मशान –घाटा वरून, परतणान्या मिनीबसमध्ये निस्तब्धता होती। रंजन हरवल्यासारखा गुपचूपन बसून होता, आसवांनी त्याची सोबत सोडून दिल्यासारखी वाटत होती। चौथ्या दिवशी स्मशानातून वेचलेल्या व लाल कपडयात गंडाललेल्या अस्थी त्याच्या पसुढयांत ठेवल्या होत्या। पत्नी सानिध्यान घलवलेला एक–एक क्षण त्याच्या नजरेसमोरून चित्रपटाप्रमाणे पुढे सरकत होता। लग्नानंतर तिच्या बरोबर घालवलेली पाच सुवर्ण वर्षे। लहान मोठया सुख दु:खाची सहभागिणी त्याला सोडून गेली होती। आपल्याच हाताने आपल्या प्रियेला त्याने अग्रीच्या सुपुर्द केले.....अरे! ती दुधाची बादली ठेवली का नाही? निस्तब्धता चिरत सासन्यांचा आवाज आला। रंजनही परत बस मधल्या वातावरणात परतला। त्याने आग्नेय नेत्रांनी आपल्या सासन्यांकडे बतिले। ‘‘तरूण मुलगी वारली....अन याला बादलीची चिंता त्रस्त करतेय?’’ आणि त्याच वेलेस त्याला आपल्या चार वर्षांच्या मुलाची आठवण झाली। बायकोच्या मृत्यूनंतर या चार दिवसांत मुलाला पार विसरलाच होता तो–एकदा सुद्धा त्याची आठवण झाली नव्हती। चहूकडे शोधता त्याने बिूला मामाच्या मांडीवर बसलेला बतिला। त्याच्या व्यथित हृदयातून निश्वास बाहेर पडला। ‘‘अरे! हा तोच का आपला बिट्टू?’’
विसकटलेले केस.....रडून लाल झालेलेघे डोले....थकलेला चेहरा....गालावार थिजलेली आसवं.....अगतिक अनाथ पोरासारखा तो दिसत होता। रंजन फार दुखावला।
अगतिक होवून बिला छातीशी कवटालून त्याने आपल्या मिठीत घेतले। |