पाचवा पेग रिचवता रिचवता, विश्वनाथ पापडे थोडे गंभीर झाले। नशेत चूर होऊन दंगामस्ती करणं काही त्यांना शोभलं नसतं। ते काही साधे–सुधे, सामान्य माणसासारखे नव्हते। ते खूप महान–महान–महान होते। त्यांच्या एका हाकेसरशी हजारो कुत्री–मांजरी एकत्र जमत। आता ते रहमान साहेबांच्या पुढे होते। रहमान साहेबसुद्धा असे तसे नाहीत। आपल्या टोळीचे मुकूटमणी आहेत ते! त्यांच्याही एका हाकेसरशी किती तरी लोक जीवावर उद्वार व्हायला तथार होतात।
‘रहमान भाई–तुम्ही आला नसतात, तर मीच येणार होतो, एकदा बोलणं व्हायला हवंच होतं!
‘हे बघ भैय्या–अख्तरची बायको रजिया, तिच्यावर माझं मन बसंलय। पण गोष्ट पुढे जातच नाही। शौकतचा मुलगा सलीम, माइया कामगारांना भडकवतोय, त्यालाही ठिकाणी लावायचंय। नरूद्दिन–तो थेरडा त्याची जमीन तशीच पडलीय। त्यावर कब्जा करायची इच्छा आहे। फडालूने कमी व्याज घेऊन पसैसे देणं सुरू केलंय। त्याला लुटायचंय। अन्वर साहेबांचं फारच गुणागान करताहेत लोक, त्यांच्या चेहन्याचर थोडं काळं फासायचंय। इम्रानने नवीन दुकान उछलंय, त्याचा माइया धंद्यावर परिणाम झालाय। त्याच्या दुकानाला आग लावायचीय।’
‘रहमान भाई, मलाही असंच वाटतं। काही लोक मरतील। काही निराधार होतील, काही जमिनी तू घे, काही मी घेईन। रामप्रसादची मुलगी लीलाला पोरकी बनवून घरी आणायचंय। विक्रम जरा शिकला सवरला नाही, तर लागलाय लगेच माइया नोकरांना हक्काच्या गोष्टी शिकवायलां हा काटाही काढून टाकायचाय। आपलं राज्य चालू राहिलं पाहिजे ना? धर्मयुद्धाच्या आडूनच या सगळलया समस्या सुटू शकतील!
‘मग? बुधवारपासून दंगा सुरू करायचा? आता निधू? माइया माणसांना काम समजवायचीत!
‘माझी माणसंसुद्धा चांगली तयार आहेत।’
‘हं...हं...डुक्कर.....’
‘हं....धर्म संकटात आहे।’
‘संकटात आम्हीसुद्धा पडू शकतो।’ |