ओफ! सिस्टर...! दु:खाने तळमळत तिने हांक मारळी।
सिस्टर...सिस्टर....!
इमरजेंसी वार्डच्या डयूटीरूमची नर्स डुळक्या ेत बसली होती। त्या बाईच्या हांकेकडे सिस्टरने मुळींच लक्ष दिलं नाही। आज सिस्टरला काहींच काम नव्हतं–मोकळा वेळ होता। फक्तया एका गावठी बाईला सेाडून कोणतीच केस नव्हती।
‘‘सिस्टर! टहो जरा बा तरी–आता सहन होत नाहीय’’–‘‘काय म्हणणं आहे?’’ पाय आपटीतच सिस्टर तिच्या जवळ आली–‘‘का उगाचच बोंबा मारतेस? हु–’’
फार दुखतय हो–दु:खाच्या अतिरेकाने दांताखाळी ओठ दाबून ती विव्हळूं लागळी।
‘‘त्रास होईल नाही तर काय? पोटात पोर टाकतांनाहा विचार केला नव्हता का? गुपचुप पडून रहा....सकाळच्या आधी काही होत नाही।’’ नर्सने मोठाळले डोळे रोखून तिला दटावले। ‘‘मेम साहेबांना–दुखतंय म्हणे–अक्ख हॉस्पिटिल डोक्यावर उचळलून ेतेय’’–बडबडतच ती डयूटी रूममधे परतली आणि पेंगू लागली।
तिकडे बाई थोडावेळ कष्टांन चुप पडून राहिली । पण कळां येताच पुन्हा ओरडायळा सुरवात केली तिनं–अहो–सिस्टर दयाकरा माइयावर–डाक्टरीण बाईंना तरी हाका मारा, आई गं–देवा–अरे आता तरी धावा–प्राण नितोय। वाचणार नाही वाटतय–हे देवा–बाईच्या ओरडण्याचा आवाज वाढतच गेला आणि नर्स पेंगत राहिली–थोडया वेळानी तिचं ओरडण–विव्हळणं बंद झालं–अगदी दमलेल्या आवाजात ती बार्द पुटपुटली–सिस्टर आता या पोराला तरी उचळ! बाईचा थकलेला आवाज ऐकताच सिस्टर खडबडून जागी झाळी–ब्रेफिक्रीने जांभई देत ती म्हणाळी, ‘‘अग गंगे ब तर या बारा नंबरला–जरा पोराळा वेगळा कर’’ नर्स ने भंगीणीला बोलावलं। ही माणसं इतकी ाणेरडी असतात नं, की जवळजाता ओकारीच येते।
वार्ड बॉय दरवाज्याच्या बाहेर जाऊन ओरडला अरे बारा नंबर बरोबर कोण आहे? आत या लवकर सिस्टर बोलावतेय।
हॉस्पिटलच्या आवारातल्या गर्दीतून एकगावकेरी धावतच आला आणि डयूटी नर्स जवळ रूम मधे कोपन्यात लाजत उभा राहिळा। त्याला काय करावे ते समजेना....शेवटी काय झालय?
‘‘हं–इथे साईन मारा’’ स्टाफ नर्स ने एक कागद त्याच्या पुढे केळा। त्याने खुणेनेच सांगितले की तो अंगठा लावेळ–गोंधळूनच त्याने अंगठा टेकवला आणि तो बाजूला होवून निमूटपणे उभा राहिला।
त्या कागदावर लिहीलेल हेातं की ‘‘मी आपल्या पत्नीचा आणि पोराचा मृत देह नेत आहे। या दवाखान्यातल्या चिकित्ससा व्यवस्थेने मी संतुष्ट आहे। येथील कर्मचारी वर्गाबछल काही तक्रार नाही।’’
-0-
|