गतिविधियाँ
 
 
   
     
 
  सम्पर्क  
सुकेश साहनी
sahnisukesh@gmail.com
रामेश्वर काम्बोज 'हिमांशु'
rdkamboj@gmail.com
 
 
 
भाषान्तर

कमल चोपड़ा
खेळण्याचे दिवस (मराठी):अनुवाद : उज्ज्वला केळकर

ती दोघं काहीच बोलली नाहीत। तेव्हा त्यांची संमती गृहीत धरून सगळी खेळणी घेऊन निघाले। मोठया उत्साहने इंडस्ट्रीयल एरियाच्या मागे जी झोपडपी झाली होती, तिथे ते गेले। ‘किती खूश होतील मुले ही खेळणी पाहून!’ आजोबांना वाटलं। अन्न...असं तसं कसंही मिळतं। शरीर झाकायला कपडेही कुणाकुणाकडून मागून मिळतात। पण खेळणा त्यांच्या नशिबात कुठली? ही खेळणी पाहून, त्यांचे चेहरे प्रफुल्लित होतील। डोळे चमकून उठतील। त्यांना खूश पाहून मलाही किती आनंद होईल....यापेक्षा चांगलं काम कुठलं असूच शकत नाही।
झोपडयांजवळ पोचल्यावर त्यांनी पाहिल।। मळके फाटके कपउे घातेली दोन मुले समोरून येत होती। त्यांनी मुलांना जवळ बोलावत म्हटलं, ‘‘मुलांनो, ही खेळणी मी तुमच्यामध्ये वाटून टाकणार आहे। यातलं तुम्हाला पसंत असेल ते एकेक खेळणं ध्या....अगदी फुकट....’’
च्कित होऊन मुलांनी त्याच्याकडे पाहिलं। नंतर एकमेकांकडे पाहिलं। नंतर खुशीने खेळणी उलटीपालटी करून बघितली। त्यांना खूश होताना पाहून आजोबांचा आनंद गगनात मावेना। काही क्षणांतच त्यांना दिसलं, दोन्ही मुलं विचारात पडलीत। त्यांचे चेहरे मलूल होत गेले।
‘‘काय झालं?’’ आजोबांनी विचारलं।
एका मुलाने खेळणं पुन्हा त्यांच्या झोळीत टाकत म्हटलं, ‘‘मी हे नाही घेऊ शकत!’’
‘‘पण का?’’
‘‘मी हे घेऊन धरी गेलो तर मायला आन् बाबाला वाटंल, मी मालाकाकडून ओवरटाईमचे पैसे त्यास्नी संगितल्याबिगर घेतले। आनि त्याचं खेलनं आनलं! कुनी खेलनं फुकाट दिलं येच्यावर त्यांचा इस्वास बसनार न्हाई। त्यांना शक यील आनि माजी पिटाई हून न्हाईल!’’
दुसन्या मुलाने खेळण्यापासून आपला हात दूर घेत म्हटलं, ‘‘सायेब, खेलणं घ्येऊन आमी काय करायचं? म्या कारखान्यात काम करतो। यिंच न्हातो।फाटेपासून रातच्या पातूर काम करतो। ह्मा खेलन्याशी क।च्या वक्ताला खेळू? आपन हीसमदीखेलणी कुना न्हान पोरास्नी द्या....’’
-0-

°°°°°°°°°°°°°°°°°°°°

 
Developed & Designed :- HANS INDIA
Best view in Internet explorer V.5 and above