जे.ई.ने बन्याच घाबरलेल्या अवस्थेत एस.डी.ओ. च्या चेंबरमध्ये प्रवेश केला– ‘‘सर! बरीच गडबड झाली आहे। नवीन काल्व्यात पाणी सोडताच ते बन्याच ठिकाणी कमकुवत कडपया तोडीत लगतच्या शेतात शिरलय। आता काय होणार सर?’’
‘‘कोणत्या कालव्याबद्दल सांगताय?’’ जे.ई.च्या घाबरगुंडीचा काही एक प्रभाव स्वत: वर न होऊ देता ते शांतपणे विचारते झाले। ‘‘तोच कालवा सर, ज्याच्या बांधकामाचे कंत्राट तुमच्या मेहुण्याकडे होते।’’
हुं.......हुंकारत साहेब म्हणाले ‘‘घाबरायची मुळीच गरज नाही। हे बघा। ज्या शेतांमध्ये पाणी भरले आहे। अगोदर त्यांची यादी तयार करा अणि त्या सर्व शेतकन्यांवर सरकारी कालव्यातून बेकायदा पाट काढून शेतास पाणी पुरवठा केल्याच्या आरोपाखाली अर्थदंड ठोकून द्या काय?’’
‘‘वा सर! काय पण आयडिया काढलीय?’’ जे.ई. चा चेहरा आनंदाने फुलून गेला।
-0-
|