गतिविधियाँ
 
 
   
     
 
  सम्पर्क  
सुकेश साहनी
sahnisukesh@gmail.com
रामेश्वर काम्बोज 'हिमांशु'
rdkamboj@gmail.com
 
 
 
भाषान्तर

रंग
अशोक भाटिया (अनुवाद–मानसी काणे)

होळीचा दिवस आहे। जसजसा दिवस चढेल तसतसा या भागात होळी खेळणान्यांचा उत्साह वाढत जातो। श्रीनिवास रात बसून वर्तमानपत्र वाचताहेत। त्यांची बायको म्हणते, ‘‘अहो, बारा वाजले। काहीतरी भाजीऊन या। कोणी रंग उडवला तरी काही विडत नाही। जुनेच कपउे आहेत।’’
उठून उभे रहात श्रीनिवास म्हणाले, ‘‘माइन्या अंगावर कोण कशाला रंग टाकेल?’’
या गावात श्रीनिवासना मान आहे। त्यांचा दबदबा आहे। आज स्कूटर नेता ते सायकलेऊन बाजारात जायला जायला निघतात। ते पाहू लागतात। सगळीकडे होळीला रंग चढला आहे। कुठं लाल, कुठं पिवळा रंग फासला जातो आहे। लोक एकमेकांना मिठया भारताहेत। कुठं ढोलकं वाजवून नाच चालला आहे। कोणालाही तसंच सोडलं जात नाहीये।
पण श्रीनिवासना अडविण्याची कोणाचीहिम्मत नाही। मोठे आफिसर आहेत। रागवले तर? त्यांच्या चेहन्यावर सुद्धा एक गर्विष्ठ भाव आहे की बा कोणीही माइन्यावर रंग उडवू शकत नाही।
तसंच होतं। तेअगदीकोरडे री येतात। सामान हातातेत पत्नी म्हणते, ‘‘बरं झालं कोणी रंग उडवला नाही।’’
श्रीनिवास ओशाळवाणं हसतात। आत येतात। रस्त्यातली रंगानं न्हालेली दृश्य एक एक करत त्यांच्या डोळयासमोर येऊ लागतात। अचानक त्यांना वाटतं की या गावात ते अगदी एकटे पडले आहेत।
ते उठतात। टेबलावर ठेवलेल्या पाकिटातून गुलाल काढतात आणि आपल्या चेहन्याला माखतात।
-0-

°°°°°°°°°°°°°°°°°°°°

 
Developed & Designed :- HANS INDIA
Best view in Internet explorer V.5 and above