गतिविधियाँ
 




   
     
 
  सम्पर्क  

सुकेश साहनी
sahnisukesh@gmail.com
रामेश्वर काम्बोज 'हिमांशु'
rdkamboj@gmail.com

 
 

 
भाषान्तर - सुकेश साहनी





 मराठी - नपुंसक :(अनुवाद : प्रदीप मोघे)



संपुर्ण हॉस्टेल मधे खळबळ माजली होती, नवाब एका मजूरिणीला धरून घेऊन आला होता। तिला नंबर चारच्या खोलीत ठेवले होते, पाच मुलं तर ‘‘उरकून’’ ही आली होती। हसत, ओरडत, पाचकळ खुणा करीत काही मुलांनी ोखरला त्या खोलीत ढकलले आणि बाहेरून दार लावून घेतलं। खोलीत ती मुलगी संपूर्ण नग्नावस्थेलत घाबरलेली होती। भयभीत नजरेनी ती शेखरकडेच बघत होती। शेखरला स्वत: ची चीड आली। डोक्यात विचारांचे कल्लोळ उठले। लाचार, अगतिक बाईबरोबर हा कसला निलाजरा, किळसवाणा क्रूर खेळ–तो बाहेर जाऊन सर्वांना खडसावेल–त्यांच्या सुप्त आत्म्याला जागवून त्या अबलेला मुक्त देण्यासं मदत करील या गोष्ठीचाच तो विचार करीत राहिला। बाहेर पाचकळ अश्लील था आणि आरडाओरड चालूच होती। तरी सुध्दा काही वेळ लोटल्यावार त्याला दारावर थाप देण्याचे झाले। कितिक डोळे ‘‘कस काय? झालं?’’ च्या अंदाजात त्याच्या वर स्थिरावले। एव्हाना त्याच्या चेहन्यावर एक विचित्रसा जडपणा आलेला होता। कोण जाणे त्याला काय वाटलं तो बेडरपणे हसला आणि हाताच्या इशान्याने खुणावून, डावा डोळा मिचकावून म्हणाला ‘‘धासू’’ प्रत्युत्तरांत सर्वांनी जोरांत शीळ घातल, ओरडले, अटटहास केला आणि त्याचे खांदे थोपटले। एवढयांत सातवा मुलगा पण आंत जाऊ ‘‘उरकून’’ आला होता। ोखर तिथून जाण्यास वळला। ‘‘कुठे निघालास?’’ एकदम सर्व विचारते झाले। त्याने ओठांवर बळजबरी हसू आणले आणि हाताच्या खूणेने स्वच्छता करून परत येतो असे सुचवले। आपल्या खोलीकडे जातांना त्याला स्वत: व्याच पावलांचे धम–धम आवाज डोक्यावर घण घालताहेत असे वाटले....नपुंसक....नपुंसक.... नपुंसक. मुक्तिदाता... नपुंसक....



°°°°°°°°°°°°°°°°°°°°


 
Developed & Designed :- HANS INDIA
Best view in Internet explorer V.5 and above