वृद्ध षेतकरी आपली अधू दृष्टी आभाळाकडे लावून बघत होता। दूरवर आभाळ स्वच्छ होते। ढगांचे, पावसाचे काही चिन्हही नव्हते। त्याच्या चेहन्यावर चिंता दाटून आली। पुन्हा दुष्काळ पडेल काय? दोन वर्शापूर्वी दुष्काळ पडला असता मुलाबाळांची पोटं भरणं कठिण झालं होतं. हे ईश्वरा! यंदा काय होणार? म्हातान्या शेतकन्याची दयनीय बडबड चालली होती।
दुसरीकडे खंड-विकास अधिकारी व त्याची पत्नी विचार करीत होते. यंदा ही पावसाला फार उशीर झाला। दुष्काळ पडेल काय? खरंच! अधिकान्याची पत्नी आनंदाने उद्गारली। दोन वर्षापूर्वी दुष्काळ पडला होता तेव्हा ‘‘मदत कोषा’’मधून तुम्ही जवळपास दहा हजार दाबले होते। हे ईश्वरा? यंदाही तसाच दुष्काळ पडो। तर मी नवीन ‘कुकिंग रेंज’घेईन म्हणते।
|